Menu Close

०२ ऑगस्ट दिनविशेष

जयंती: –
पुरुषोत्तम शिवराम रेगे (पु.शि. रेगे) (१९१०)
लेखक: – रेग्यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील मिठगाव या गावात झाला होता. मुंबई व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील व गोव्यातील विविध महाविद्यालयांत अध्यापन केले.
रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्‍न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्‍या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कविमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर शब्दांची मधुर पखरण असे.
“फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबर्‍या दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह आहे.
या साहित्याखेरीज त्यांनी काही शैक्षणिक पुस्तकेही लिहिली आहेत. छंद या द्वैमासिकाचे संपादन ही रेगे यांची आणखी एक क्षणीय कामगिरी होय. हे भाषा, कला व साहित्य या विषयांना वाहिलेले हे एक वाङ्मयीन नियतकालिक होते. १९५४ मध्ये काही समानधर्मीयांच्या सहकार्याने त्यांनी ते सुरू केले. १९६० साली ते त्यांनी बंद केले. रेगे यांनी छंदमध्ये विपुल लेखन तर केलेच; पण त्याची संपादकीय व्यावहारिक व आर्थिक बाजूही आस्थेने संभाळली. ते सरकारी नोकरीत असल्याने छंदवर संपादिका म्हणून त्यांच्या पत्‍नीचे, सरिता रेगे यांचे नाव छापलेले असे.
(विकीवरून साभार)

गोविंद पुरुषोत्तम देशपांडे (गो. पु. देशपांडे) (१९३८)
विचारवंत, नाटककार, कवि आणि निबंधलेखक: – सातारा जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. ते दिल्ली विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले होते. ते चिनी भाषा-तज्ज्ञ होते, आणि भारत-चीन राजकीय संबंधाचे जाणकार होते. गो.पु. देशपांडे यांनी इंग्रजी-मराठीत वैचारिक, रंगभूमीविषयक, राजकीय आणि साहित्यविषयक लेखन भरपूर केले.
प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात गो.पु. देशपांडे यांनी विचारनाट्याची धारा पहिल्यांदा निर्माण करण्याचा यत्न केला. राजकीय जाणिवा ही या लेखनामागची प्रेरणा आहे. गो.पु. देशपांडे हे अनेक राजकीय चळवळींचे साक्षीदार होते; पूर्वी काहीसे संबंधितही होते. जाणतेपणाने त्यांनी राजकीय चळवळींचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांच्या नाटकातील विचारांना आणि आशयाला एक प्रकारची विश्वासार्हता होती. उध्वस्त धर्मशाळा ह्या नाटकाने श्रीराम लागू प्रभावित झाले आणि त्यांनी त्या प्रयोग केले
(विकीवरून साभार)

पुण्यतिथी : –
पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक सखाराम बापू बोकील (१७८१): – बारभाई हे नारायणराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे आणि दुसरे बाजीराव पेशवे यांच्या सत्ताकाळात त्यांच्या वतीने कारभार पाहणारे बारा व्यक्तींचे मंडळ होते. नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर त्यांच्या गर्भवती पत्नी व होणाऱ्या संततीचे रक्षण करण्यासाठी हे मंडळ एकत्र आले व नंतर त्यांनी कारभार पाहिला. या मंडळाचे सदस्य खालीलप्रमाणे होते –

नाना फडणवीस
सखारामबापू बोकील
हरिपंत फडके
मोरोबा फडणीस
त्रिंबकराव पेठे
महादजी शिंदे
तुकोजीराव होळकर
भगवानराव पंतप्रतिनिधी
मालोजी घोरपडे
सरदार रास्ते
बापूजी नाईक
फलटणकर

उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ उभा राहिला होता.नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, “रघुनाथरावाला काढून टाकू नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले.” यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. ह्यातच सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेचे प्रमुख म्हणून ठेवावे असे ठरले हो. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असे उघड राजकारण सुरू झा. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. या लढाईत त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईला मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन १८ मे १७७४ रोजी त्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. यानंतर बारभाईत मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाईक, परशुरामभाऊ पटवर्धन, भोसले इ. मंडळींचा समावेश करण्यात आला. रघुनाथराव आणि बारभाई यांच्यात बरेच वर्षे संघर्ष चालू होता. रघुनाथरावाने इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला. रघुनाथरावाला ताब्यात घेण्यासाठी बारभाईनी इंग्रजांशी १ मार्च १७७९ रोजी पुरंदरचा तह केला.
(विकीवरून साभार)