Menu Close

Adelaide Marathi Vidyalay (AMV)

ॲडलेड मराठी विद्यालय

ॲडलेड मराठी मंडळ मराठी भाषा, परंपरा, संस्कृती, इतिहास, साहित्य जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी आपल्या पुढच्यापिढीला जर मराठी भाषा लिहिता, वाचता आली नाही तर ती या संपन्न परंपरेला मुकेल हा विचार पालकांच्या मनांत निश्चितचशंका,अस्वसथता निर्माण करणारा होता.

फेब्रुवारी २०१७ मध्ये काही स्वयंसेवकांनी स्वयंप्रेरणेने अडलेड मराठी विद्यालय सुरू केले. अभिमानाने सांगण्यासारखी प्रगती मराठी विद्यालयाने या पांच वर्षातकेली आहे. २०१७ मध्ये पांच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या विद्यालयांत आज (२०२२) पांच वर्षांनंतर पन्नास विद्यार्थी आनंदाने , हसतखेळत मराठीभाषा शिकत आहेत.

अडलेड मराठी विद्यालयाला Ethnic School Association of South Australia कडून मान्यता प्राप्त करण्यासाठी मराठी मंडळाच्या संविधानाची (Constitution) मदत घेऊन अर्ज केल्यानंतर २०१९ मध्ये विद्यालयाला Formal Ethnic School अशी मान्यता मिळाली.

नंतर शाळेच्या स्वयंसेवकांनी इतर कामे हाताळली आणि विद्यालयाला Charles Campbell College in Paradise येथे जागा ही मिळाली. दर रविवारी दुपारी २:३० ते ४:३० या वेळांत भरणाऱ्या शाळेत लिहिण्या वाचण्या बरोबरच विद्यार्थ्यांना आपले सणवार, परंपरा, इतिहास यांचीही माहिती दिलीजाते. हे सर्व मनोरंजक करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. आपले सणवार अगर इतर महत्वाच्या दिवशी शिक्षक त्या दिवसाचे महत्व हस्तकला, विडिओ, गोष्टी- गाणी अशा मुलांना आवडतीलअशा माध्यमांत त्यांना समजेल अशा तर्हेने शिकवतात.

मग मुले दर रविवारी शाळेत जाण्याची वाट बघत असतील यांत नवल नाही.

विद्यालयांत नांव नोंदवायचे असल्यास adelaidemarathividyalay@gmail.com येथे संपर्क साधावा.

As a major step towards connecting our future generations with our culture, traditions and more importantly to our language, Marathi School initiative was started by some of the volunteers in the community in Feb 2017. School has grown steadily and now enjoys a healthy student count. School is recognized as a formal ethnic school by ESASA (Ethnic School Association of South Australia). As  result AMV now has a venue, Charles Campbell College in Paradise.
 
School has identified innovative ways to try and connect students with our roots. School curriculum is tailored to accommodate several key festivities, traditional processions and customs. On those special days school has a session where teachers explain to students through crafts/videos/songs .
 
Venue: – 3 Campbell road, Paradise, SA 5072
Time: – Every Sunday 02:30 to 04:30 PM (During school term)
 
If you would like your child to enroll in AMV, please contact school at adelaidemarathividyalay@gmail.com