एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ.
मायभूमी सोडून हजारो मैल दूर या नव्या देशांत आल्यावर येथे आपले जीवन स्थिरस्थावर , आनंदी, सुखदाई करण्याचा जो पंथ आपण निवडला तो सु म्हणजे चांगला व्हावा ह्यासाठी एकमेकांना साह्य करावे हा ॲडलेड मराठी मंडळाचा उद्देश आहे.
नवीन आलेल्यांच्या आणि आधी येऊन स्थाईक झालेल्यांच्या गाठीभेटी व्हाव्यात, मराठीतून गप्पा मारता याव्यात , माहिती मिळावी, आपले सणवार एकत्र साजरे करावे, कलागुणांना वाव मिळावा, आपली परंपरा, संस्कृती जागृत रहावी आणि या भूमीवर वाढणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीलाही त्यांची महती कळावी असे मराठी माणसाला वाटणे हे अगदी स्वाभाविक आहे.
मराठी मनाची ही ओढ पुरवण्याचा मराठी मंडळाचा प्रयत्न असतो. त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक सण हे त्या त्या पद्धतीने साजरे करणे, मराठी भाषा, इतिहास, साहित्य,भारतीयपुरातन शास्त्र,
विद्या या विषयांवर कार्यक्रम करणे तसेच या भूमीला आपली मानल्यावर येथील समाजासाठी काहीतरी काम करणे हे आपले कर्तव्य आहेच तेंव्हा असे सामाजिक उपक्रम करणे असा मराठी मंडळाचा मार्गक्रम सुरू आहे.
मंडळाचा हा मार्ग यशस्वी होण्यासाठी – एकमेका साह्य करू.
Adelaide Marathi Mandal represents and upholds Marathi culture in Australia through different traditional and innovative programs. It belongs to all individuals who have an affinity for Marathi culture, food, Language, arts, Literature, history and music. For all people in South Australia and Adelaide who share this common bond, AMM endeavours to provide a platform for them to meet, socialise, and celebrate festivals and events while sharing the joyous spirit of Maharashtra. AMM is a non-profit organisation with a mission to:
- Promote, preserve, and cherish Marathi culture by promoting local talent in Adelaide and bringing quality programs from India in arts/education/religion/history and literature.
- Pass on the Marathi cultural heritage to the next generation covering all the aspects.
- Be a ‘home away from home’ for the new migrants and help them assimilate into Australia by promoting a sense of belonging.
Our Committee Members / Volunteers